Aajcha IMD Havaman Andaj भारतीय हवामान खात्याने या 16 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, पुन्हा पाऊस या जिल्ह्यांना जोडपणार असल्यास अंदाज आहे. तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा वेग पकडत आहे. 17 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
पश्चिम बंगाल आणि गुजरात मध्ये निर्माण झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमध्ये मान्सूनला चाल मिळाली आहे. त्यामुळे राज्यात दमदार पुनर्गमन झाल्याचे दिसून येत आहे, आता पाहायला गेलं तर कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस असेल हे आपण समजून घेऊया.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 18 जून रोजी कोकण आणि घाट माथ्याच्या वर जोरदार पावसाचा इशारा आहे. यासाठी ऑरेंज अलर्ट पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे.
Aajcha IMD Havaman Andaj 18 June 2025
मुंबई, ठाणे, नाशिकच्या घाटमाथा जोरदार पावसाचा Yellow Alert देण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये विधानच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहेत.
उर्वरित भागांमध्ये देखील जोरदार पाऊस पावसाची शक्यता आहे. राज्यात उत्तर भागांमध्ये आणि काही अंतर्गत जिल्ह्यांमध्ये वादळी व विजांसह पावसाची शक्यता आहे.