या शेतकऱ्यांना आता खरीप पिक विमा मिळणार नाही ही नवीन अट लागू Pik Vima 2025

Pik Vima 2025 शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा पिक विमा संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आली आहेत. न्यूज 18 मराठी वेबसाईटवरून महत्त्वाची बातमी आलेली आहे. आता हे काम केल्याशिवाय खरीप हंगाम पिक विमा मिळणार नाही, या संदर्भातली शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आहे. हवामान आधारित फळ पिक विमा योजनेचा मृग बहार हगामासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.

यावर्षी पासून अर्ज करणाऱ्या अटींमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे. तर काय? बदल या ठिकाणी समजून घेऊया, अर्जदार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक करण्यात आले आहे.

तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तो लगेचच काढून घ्या भारतीय कृषी कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल या चार प्रमुख विमा कंपनीच्या माध्यमातून जात आहे.

फळ पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वेगवेगळी आहे, यासंदर्भात स्थानिक कृषी विभागाकडून माहिती दिली जाणार आहे. परंतु अर्ज फार्मर आयडी नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

Pik Vima 2025 फार्मर आयडी म्हणजे काय आणि ते का आवश्यक ? 

शेतकऱ्यांचा ओळख अधिकृत क्रमांक आहे जो ओळख पटवण्यासाठी आहे. कृषी विभागाच्या agristack प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून मिळवता येतो. ज्या शेतकऱ्यांचे ओळख तयार आणि शासकीय योजनेचा लाभ गरजू पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लाभ मिळतो.

आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी पिक विमा साठी सुद्धा आवश्यक असणार शेतकऱ्यांसाठी सूचना आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अजून ही काढला नसेल तर या ठिकाणी काढून घ्या. तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यक अधिकारी, तलाठी, किंवा मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधून agristack प्रणाली दरी नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर मिळणार फार्मर आयडी सुरूच ठेवा. विमा अर्ज करण्याआधी आपला आयडी नंबर तपासून खात्री करणे गरजेचे आहे, असे या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळते. 

Leave a Comment