tur top 3 biyane तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहे, सध्या खरीप हंगामाची लागवड सुरू आहे. खरीप हंगामामध्ये लागवड करत असताना तुम्ही जर तुरीची लागवड करायचं विचार करत असताना तर तुमच्यासाठी आज घेऊन आलोय.
जे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाण व सविस्तर माहिती. तुर पिकाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन 15 ते 20 क्विंटल पर्यंत नेणारी शेतकरी आहेत. तुम्हाला देखील या ठिकाणी चांगल्या वाणाची निवड करायची असेल तर हे वाण तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, तर ते खालील प्रमाणे पाऊ शकता.
BDN 711 पांढरी :- या वाण्याची लागवड कालावधी 150 ते 155 आहेत प्रती एकर पाच ते सहा किलो, उत्पादन क्विंटल प्रति एकर सात ते आठ आणि वैशिट्य पांढरे वाण, कोरडवाहू लागवड योग्य आहे मर आणि वांज रोगास प्रतिकार आहे.
BDN 716 लाल :- याचा कालावधी 165 ते 170 दिवस आहे, प्रती एकर बियाणे पाच ते सहा किलो, सरासरी उत्पन्न प्रति एकर मध्ये आठ ते नऊ क्विंटल, दाण्याचा रंग लाल आणि शेंगाचा रंग पूर्ण हिरवा आहे. मर आणि वांझ रोगास प्रतिकार आहे.
BDN 2013-41 गोदावरी पांढरी :- कालावधी 160 ते 165 दिवस, प्रति एकर बियाणे पाच ते सहा किलो, उत्पादन प्रति एकर 10 ते 11 क्विंटल दाण्याचा रंग पांढरा 100 दाण्याची वजन 11 ग्रॅम एवढे आहे. महाराष्ट्रात सर्वात इतर वाणाचे तुलनेत सर्वाधिक उत्पन्न देणारे वाण आहेत.